पुन्हा ‘धोणी’पछाडः धोनीच्या खेळीचे दिग्गजांकडून कौतुक

त्याच्या या खेळीमुळे पुन्हा एकदा त्याने चाहत्यांची मने जिंकली असून, क्रिकेट विश्वातील दिग्गजांनीही त्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे.

120

भारतीय क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीचे नाव कायमंच घेतले जाते. आपल्या संघाला जिंकण्यासाठी ठराविक धावसंख्येची गरज असताना, नेहमी आपल्या धडाकेबाज कामगिरीने विजय खेचून, तो आपल्या संघाच्या झोळीत टाकणा-या धोनीने पुन्हा एकदा अशीच एक अविस्मरणीय कामगिरी केली आहे.

बेस्ट फिनिशर म्हणून ओळख असणा-या धोनीने आयपीएलच्या रविवारी झालेल्या चेन्ई विरुद्ध दिल्ली सामन्यात पुन्हा एकदा आपल्याला मिळालेली ही उपाधी सार्थ ठरवली आहे. आपल्या संघासाठी तुफान फटकेबाजी करत धोनीने संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं आहे. त्याच्या या खेळीमुळे पुन्हा एकदा त्याने चाहत्यांची मने जिंकली असून, क्रिकेट विश्वातील दिग्गजांनीही त्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे.

धोनीची जादू

रविवारी पुन्हा एकदा सर्वांना धोनीची फिनीशींन स्टाईल पहायला मिळाली. रविवारी झालेल्या आयपीएल सेमी फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये रोमहर्षक सामना रंगला. अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं आवश्यक होतं. चेन्नईच्या हातून सामना जवळपास निसटल्याचे वाटत असतानाच धोनी महाशयांनी आपली जादू दाखवत सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर चार विकेटने विजय मिळवून आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत धडक मारली. आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी धोनीने एक महत्वपूर्ण भूमिका बजावली. एमएस धोनीच्या या दमदार खेळीनंतर क्रिकेट प्रेमींनी ट्वीट करुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

सेहवागने केले कौतुक

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर धोनी नंबर 6 वर फलंदाजीसाठी आला आणि संघाला जिंकण्यासाठी लागणा-या धावसंख्येचा पाठलाग करताना धोनीने उत्तम खेळी केली. याबाबत भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने ओम फिनिशाय नमः असे म्हणत धोनीच्या खेळाचे कौतुक केले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्वीट करत, किंग परत आल्याचं म्हटलं आहे. धोनीची खेळी पाहून मी जागेवर उठून उड्या मारण्याचा मोह आवरू शकत नसल्याचे कोहलीने म्हटले.

सुरेश रैनाने सुद्धा ट्विट करत धोनीला तुझ्यावरचा माझा विश्वास दिवसेदिवस वाढत चालल्याचं ट्विट करत म्हटलं आहे.

ट्विटरवरील क्रिकेट बंधूंच्या काही सर्वोत्तम प्रतिक्रिया-

त्याला आणि टीमला 15 ऑक्टोबरला होणा-या अंतिम सामन्यासाठी चार दिवस विश्रांती मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.