ट्विटरवर रंगलाय आता राजकीय ‘ऊवाच’, संजय ‘ऊवाच’ला ‘कृष्ण ऊवाच’ने उत्तर

155

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवल्यानंतर आता शिवसेना विरूद्ध भाजपा असा वाद रंगला असून, ट्विटरवर आता शिवसेना आणि भाजपा नेत्यांचा शायराना अंदाज पहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शायराना अंदाजात केलेल्या ट्विटला त्याच अंदाजामध्ये उत्तर दिले आहे. ‘संजय ऊवाच’ या मथळ्याखाली संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. त्यानंतर भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी देखील ‘कृष्ण ऊवाच’ या मथळ्याखाली एक ट्विट केले आहे.

संबित पात्रा यांचे ट्विट

कृष्ण ऊवाच: “हे संजय: क्योंकि मैंने आपको दिव्य चक्षु प्रदान किया है, ज़रा अपने समीप बैठे “धृतराष्ट्र” से कहिए की पुत्र मोह में वे इंद्रप्रस्थ गवाने जा रहे है,” अशा आशयाचं ट्विट संबित पात्रा यांनी संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देताना केले आहे.

संजय राऊत यांचे ट्विट 

“उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है…”, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. तसंच या ट्विटखाली त्यांनी जय महाराष्ट्र असेही लिहिले आहे. हे ट्विट नक्की कशासंदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.