काश्मिरातील जवानांचे रक्त वाळण्याआधीच सूड घ्या! 

काश्मिरात अलीकडे घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना पाहता नव्वदच्या दशकात अतिरेक्यांनी जी दहशत निर्माण केली होती, त्याच दिशेने तर पुन्हा कश्मीरची वाटचाल सुरू नाही ना, अशी शंका उपस्थित होते, असे शिवसेनेने म्हटले आहे.

124

काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी हल्ले पुन्हा वाढले आहेत. काश्मिरातील वास्तव्यास असलेल्याला काश्मिरी पंडित आणि शीख धर्मीय यांची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी ५ जवानांचा जीव घेतला. त्यावर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया दिली. सुरनकोटच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचा ‘पाँच के पच्चीस’ असा जबरदस्त सूड उगवलाच पाहिजे, असे आवाहन शिवसेनेने मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून केले आहे.

(हेही वाचा : समीर वानखेडेंच्या मागे गुप्तहेर…पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार)

पुन्हा नव्वदच्या दशकाच्या दिशेने वाटचाल

काश्मिरात अलीकडे घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना पाहता नव्वदच्या दशकात अतिरेक्यांनी जी दहशत निर्माण केली होती, त्याच दिशेने तर पुन्हा कश्मीरची वाटचाल सुरू नाही ना, अशी शंका उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या राक्षसी अत्याचारांमुळे हजारो कश्मिरी पंडित कच्च्या-बच्च्यांसह काश्मिरातील सगळी मालमत्ता सोडून गेली पंचवीस वर्षे तात्पुरत्या राहुटय़ांमध्ये नरकयातना भोगत आहेत. कश्मिरी पंडितांचा विजनवास संपावा म्हणून कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-कश्मीरचे तमाम विशेष अधिकार काढून घेतल्यानंतर कश्मीरातील पाकिस्तानचे बगलबच्चे अधिकच चेकाळले आहेत. इतर धर्मीयांनी कश्मीरात पाऊलच ठेवू नये या विकृत मानसिकतेतून पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अतिरेक्यांनी कश्मीरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.