लॉकडाऊन शिथीलतेनंतर रेल्वेला ‘अच्छे दिन’! किती वाढला महसूल?

आतापर्यंत रेल्वेने कोविडच्या आधी कार्यरत असलेल्या 96 टक्के गाड्या पूर्ववत केल्या आहेत.

111

देशातील लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलीआहे. त्याचा फायदा रेल्वेला देखील होऊ लागला आहे. लॉकडाऊन शिथीलतेनंतर रेल्वेने 2021-2022 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रवासी विभागाच्या उत्पन्नात 113 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे 2020-21 दरम्यान रेल्वेची कमाई कमी झाली होती. दरम्यान आतापर्यंत रेल्वेने कोविडच्या आधी कार्यरत असलेल्या 96 टक्के गाड्या पूर्ववत केल्या आहेत. एवढेच नाही तर जसजशी परिस्थिती सुधारेल तसतसे गाड्यांचे संचालन आणखी वाढवले ​​जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

असे आहे उत्पन्न

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत रेल्वेने प्रवासी भाड्यातून 4,921.11 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या तिमाहीत, रेल्वेची कमाई 10,513.07 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत अनेक टक्के वाढ झाली आहे. कोरोना काळात रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्न कमावले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये रेल्वेचे मालवाहतूक लोडिंग गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 3.62 टक्के जास्त होते. सप्टेंबर महिन्यात रेल्वेने 106 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. गेल्यावर्षी याच कालावधीत हे प्रमाण 102.3 दशलक्ष टन होते. त्यामुळे यंदा यामध्ये 3.62 टक्क्यांची भर पडली आहे. मालवाहतूक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून संबंधित ग्राहकांना अनेक सवलती देखील दिल्या जात आहेत. या कालावधीत, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 10,815.73 कोटी रुपयांची कमाई केली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.19 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेला मालवाहतूक करुन 9,905.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

(हेही वाचा : महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘असा’ होणार आग आणि धुरापासून बचाव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.