राज्यातील कोरोना रुग्णांचा चढता आलेख गेल्या काही दिवसांपासून उतरत असल्यामुळे आता राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला. सर्वांनी एकमताने या निर्णयाला सहमती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे निर्णय?
लसींचे दोन्ही डोस घेतेलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यापीठांची महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे नियम पाळूनच महाविद्यालये सुरू होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात कोरोना परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः दीड वर्षांनी शाळा भरली! शाळेच्या पहिल्या दिवसाचे फोटो इथे शेअर करा… शिक्षणमंत्र्यांचे आवाहन)
लसीकरण मोहीम राबवणार
जास्तीत-जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर राज्य सरकारतर्फए भर देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जलद लसीकरण करण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाविद्यालीन वसतीगृह सुरू करण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. त्यामुळे उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहे.
Join Our WhatsApp Community