सेना भवनासमोरच मनसे म्हणते ‘गर्व से कहो हम हिंदू है!’

दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनसेच्या वतीने थेट शिवसेना भवनाच्या समोरच बॅनर लावण्यात आला आहे.

151

आज तमाम शिवसैनिकांसाठी प्रथे परंपरेनुसार विचारांचे सोने लुटण्याचा दिवस आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा होणार आहे. मात्र याच मेळाव्याचे औचित्य साधून मनसेने थेट सेनेला डिवचले आहे आणि सेनेच्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवला आहे.

सेना भवनासमोर हिंदुत्वाची गर्जना! 

दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनसेच्या वतीने थेट शिवसेना भवनाच्या समोरच बॅनर लावला आहे. ज्यामध्ये एकच वाक्य ठसठशीत छापले आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’. या बॅनरवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो आहे आणि मनसेच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा : अखेर आव्हाडांना अटक झालीच! काय म्हणाले करमुसे?)

मनसेकडून हिंदुत्वाची आठवण! 

हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून ज्या शिवसेनेकडे पाहिले जाते, त्या शिवसेनेने महाविकास आघाडी करून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून सेनेचे हिंदुत्व हरवले आहे, अशी टीका भाजपा करत आहे. आता मनसेनेही याबाबत भाष्य करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे महराष्ट्राच्या राजकीय पटलावर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सेनेची ओळख पुसू लागताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २ वर्षांपूर्वीच ‘त्यांच्या पक्षाची वाटचाल आता प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने सुरु असेल’, असे घोषित करत पक्षाचा झेंडाही भगवा केला. तेव्हापासून राज ठाकरे यांनी अनेकदा हिंदुत्वाचे विषय उचलून धरले. दसऱ्याच्या निमित्ताने मनसेने शिवसेना भवनासमोर ‘गर्व से कहो हम हिंदू है’, असे वाक्य असलेला बॅनर लावून हाच संदेश दिला आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.