आर्यन खानला कोणी पाठवली तुरुंगात मनीऑर्डर? वाचा…

आर्यन खान सेलिब्रेटी असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना सुरक्षित असलेल्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे.

176

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आर्थर रोड तुरुंगातील कँटिंगमध्ये खरेदी करण्यासाठी वडील शाहरुख खानने पाठवलेली साडे चार हजार रुपयांची मनी ऑर्डर मिळाली असल्याची माहिती आर्थर रोड तुरुंगाधिकारी यांनी दिली. या पैशात आर्यन कँटीनमधून स्वतःसाठी गरजेच्या वस्तू खरेदी करू शकतो, अशी माहिती अधिकारी यांनी दिली आहे. तसेच आर्यन खान याने आई-वडिलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला असून १० मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली असल्याचे समजते.

आर्यनला क्वारंटाईन सेलमधून सामान्य सेलमध्ये आणण्यात आले

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खानसह ६ जण आर्थर रोड तुरुंगात असून दोघी जणी भायखळा महिला तुरुंगात आहे. गुरुवारी सत्र न्यायालयाने आर्यन खान सह तिघांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवत २० ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर सुनावणी होणार असल्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान बुधवारी आर्यनला क्वारंटाईन सेलमधून सामान्य सेलमध्ये आणण्यात आले आहे. आर्यन खान सेलिब्रेटी असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना सुरक्षित असलेल्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा : मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटणार नाही! मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला)

सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगातील साधे जेवण

आर्यनला तुरुंगात सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगातील साधे जेवण दिले जात असून सर्वांसाठी असलेल्या सुविधांचा वापर आर्यन देखील करीत आहे. आर्यनला तुरुंगात टूथपेस्ट, ब्रश व इतर खाण्याच्या वस्तूची गरज असल्यामुळे त्याला तुरुंगातील कँटिनमधून विकत घ्यावे लागणार असल्यामुळे त्याने वडिलांना निरोप पाठवून पैशाची मनी ऑर्डर मागवली होती. तुरुंगाच्या नियमानुसार कैद्यांना जास्तीत जास्त ४.५ हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठवता येते. गुरुवारी आर्यन खानच्या नावाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाला ४.५ हजार रुपयांची मनी ऑर्डर मिळाली असल्याचे तुरुंग अधिकारी यांनी सांगितले.

व्हिडिओ कॉलवर १० मिनिटे बोलण्याची परवानगी दिली

कोविड-१९ च्या नियमानुसार तुरुंगातील न्यायबंदींना नातेवाईकांची प्रत्यक्षात भेट घेण्यावर बंदी असल्यामुळे तुरुंगात व्हिडिओ कॉलिंग सुविधा करण्यात आलेली आहे. आठवड्यातून दोन वेळा न्यायबंदीला आपल्या जवळच्या नातेवाईकांशी बोलण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आर्यन खानने आपली आई गौरीचा मोबाईल क्रमांक तुरुंग प्रशासनाकडे पाठवून व्हिडिओ कॉलिंगसाठी विनंती केली होती. तुरुंग प्रशासनाने मोबाईल क्रमांकाची खात्री करून बुधवारी त्याला व्हिडिओ कॉलवर १० मिनिटे बोलण्याची परवानगी दिली होती. आर्यन आई गौरी आणि वडील शाहरुख यांच्यासोबत १० मिनिटे व्हिडिओ कॉलवर बोलला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.