ठाणे भिवंडी येथे कशेळी परिसरात एका फर्निचर गोदामाला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत गोदामामधील फर्निचर जळून खाक झाले. ही आग काही क्षणात आजूबाजूला पसरली. त्यामुळे ५० हुन अधिक गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
भिवंडीत आगीचे सत्र सुरूच
दसऱ्याच्या रात्री भिवंडीत मोठे अग्नितांडव पहायला मिळाले. फर्निचर गोडाऊनसह कारखान्याला आग लागल्याने लाखो रूपयांचे फर्निचर जळून खाक झाले. ही आग इतकी भीषण होती की, भिवंडी, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. या घटनेमुळे भिवंडीत आगीचे सत्र थांबलेले नाही, असेच अधोरेखित होत आहे. ही भीषण आग भिवंडी – ठाणे मार्गावर भिवंडी तालुक्यातील कशेळी टोलनाक्यानजीकच महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे, त्याला लागली. भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे इथल्या अग्निशमन दलांनी आग विझवण्यासाठी तब्बल ६ तास शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर आग विझवण्यात यश आले. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र उघड झाले नाही. आगीमुळे शेजारची इतर दुकानेही जळून खाक झाली. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
(हेही वाचा : मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटणार नाही! मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला)
Join Our WhatsApp Community