एसटी महामंडळाचा ‘चित्रमय एसटी’, ‘बस स्थानक ओळखा’ उपक्रम सोशल मिडीयात ट्रोल

'#चित्रमयएसटी' या मोहिमेत ट्विटरवर एसटीचे सुंदर फोटो काढून कॅप्शन लिहून ते एसटी महामंडळाला टॅग करायचे. तर 'बस स्थानक ओळखा' या हॅशटॅग अंतर्गत तुमच्या भागातील स्वच्छ स्थानकांचे फोटो काढून ते एसटी महामंडळाला टॅग करायचे. हे फोटो महामंडळाच्या पेजवर झळकतील, अशाप्रकारे हे उपक्रम राबवले जात आहेत.

137

महाराष्ट्राच्या लालपरीने राज्याच्या कानाकोप-यात आपले जाळे विणले आहे. एसटी हा शहर आणि गाव यांमधील मुख्य दुवा आहे. अनेक मुलांना शिक्षणाची वाट या एसटीमुळे प्राप्त झाली. कोरोना महामारीच्या जागतिक संकटानंतर एसटीचा प्रवासीवर्ग दुरावला. खासगी कंपन्यांच्या वाढत्या वाहतुकीमुळे एसटीवर परिणाम झाला. म्हणूनच दुरावलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने ‘चित्रमय एसटी’, ‘बस स्थानक ओळखा’ हे अनोखा उपक्रम सुरु केले आहेत. महामार्गावरुन धावणारी, द-या-खो-यातून निर्सगाला साद घालणारी, गावाकडून लाल मातीचा सुगंध घेऊन येणारी ही एसटी ‘#चित्रमयएसटी’ उपक्रमातून सोशल मिडीयावर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे.

‘#चित्रमयएसटी’, ‘बस स्थानक ओळखा’ काय आहे मोहीम?

‘#चित्रमयएसटी’ या मोहिमेत ट्विटरवर एसटीचे सुंदर फोटो काढून कॅप्शन लिहून ते एसटी महामंडळाला टॅग करायचे. तर ‘बस स्थानक ओळखा’ या हॅशटॅग अंतर्गत तुमच्या भागातील स्वच्छ स्थानकांचे फोटो काढून ते एसटी महामंडळाला टॅग करायचे. हे फोटो महामंडळाच्या पेजवर झळकतील, अशाप्रकारे हे उपक्रम राबवले जात आहेत.

(हेही वाचा : भूक निर्देशांक मूल्यांकन अशास्त्रीय! केंद्राने केला खुलासा)

उपक्रम झाला ट्रोल!

दुरावलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने समाजमाध्यमांची दारे खुले करून ‘#चित्रमयएसटी’, ‘बस स्थानक ओळखा’ मोहिमा सुरु केल्या. पण, या मोहिमा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केला जात आहेत. यावर अनेक प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत या मोहिमांपेक्षा महामंडळाने एसटी बस दुरूस्त कराव्यात, स्थानके स्वच्छ ठेवावीत, सेवा सुधारावी, असे सल्ले दिले आहेत. अनेक नेटक-यांनी तर दूरवस्था झालेल्या एसटी स्थानकांचे फोटो ‘बस स्थानक ओळखा’ या हॅशटॅग अंतर्गत टाकले आणि महामंडळाला सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.

https://twitter.com/Yuvraj87456753/status/1448940905914777606?s=20

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.