भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं सत्र चालवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी वारंवार अनेक नेत्यांवर आरोप केले असतानाच, आता त्यांनी चक्क पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.
काय आहे आरोप?
आपल्या यादीत बारा नेत्यांची नावं होती आणि त्यात आता काही राखीव नेत्यांची नावं आपण वाढवली असून, त्याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रविवारी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. अजित पवारांच्या बहिणी या जरंडेश्वर कारखान्यात भागीदार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच यासंबंधीचे पुरावे मी ईडीला सोपावणारं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचाः साहेब! किती हा भाबडेपणा?, फडणवीसांचा पवारांना टोला)
पवार काय उत्तर देणार?
त्यामुळे किरीट सोमय्या आता थेट पवार घराण्यालाच आव्हान करत असल्याने, पवार परिवार याला काय उत्तर देणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर तसेच नवाब मलिक यांच्या जावयावरही आरोप केले होते.
Join Our WhatsApp Community