पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिक आधीच हैराण झालेले असताना आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वाढत्या इंधन दरवाढीबाबत मोठं विधान केलं आहे. हे दर सध्यातरी कमी करणे अशक्य असल्याचं वक्तव्य पुरी यांनी शनिवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमावेळी केले. त्यामुळे इंधनाच्या पेटलेल्या किंमतींची झळ सर्वसामांन्यांना अजून काही काळ सोसावी लागणार असल्याचे समजते.
पेट्रोल-डिझेलच्या वापरात वाढ
कोरोनानंतर पेट्रोल आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही काळापासून देशात पेट्रोलच्या वापरात 10 ते 15 टक्के तर डिझेलच्या वापरात 6 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या किंमती वाढत आहेत. पण केंद्र सरकार या किंमती स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे हरदीप सिंह पुरी म्हणाले.
(हेही वाचाः भारतात इंधन ‘पेटले’, म्हणून भारतीय ‘या’ देशात पळत ‘सुटले’! मिळतंय स्वस्त इंधन)
सातत्याने होत आहे दरवाढ
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज देखील इंधनांच्या दरात वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 35 पैशांची वाढ पहायला मिळाली आहे. मुंबईतही सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा आलेख हा सातत्याने वाढताना दिसत आहे.
Join Our WhatsApp Community