शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपाने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाला प्रत्त्युत्तर दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
(हेही वाचाः साहेब! किती हा भाबडेपणा?, फडणवीसांचा पवारांना टोला)
काय म्हणाले संजय राऊत?
दादरा-नगर हवेली येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राऊत यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र व देशात गांजाचं पीक जास्तच निर्माण झालं आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण काही लोक गांजा मारुन काम करताना दिसत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळाव्यानंतर हे असले प्रकार वारंवार पहायला मिळत आहेत. राज्याच्या विरोधी पक्षातील नेते बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत. या सर्वांची एनसीबीने नार्को टेस्ट करायला हवी. ते नेमकी कोणती मारतात, त्यांना कोणी गांजा पुरवतं का, याचा तपास लावणं गरजेचे आहे. कारण इतक्या बेधुंदपणे कारभार करू शकत नाही, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.
(हेही वाचाः विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवा… पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)
शिवसेनेकडून खासदारकीसाठी उमेदवारी
दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर तेथील खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी आता पोटनिवडणूक पार पडणार आहे. खासदार डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि त्यांचे पुत्र अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे खासदारकीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे.
Join Our WhatsApp Community