राज्यातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे, मात्र हा प्रवास उशिरा सुरु झाल्याने नेहमी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर हिट अनुभवयास मिळायची ती पावसाचा उशिरापर्यंत मुक्काम वाढल्याने अनुभवता येत नाही. परंतु आता राज्यातीलन बऱ्याच भागातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात कोरडे वातावरण अनुभवयास मिळणार आहे. म्ह्णून तापमानात वाढ होणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मागील दोन दिवस पावसाची रिपरिप सुरूच!
औरंगाबाद शहरात परवा रात्रीपासून रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. शहरासह वाळूज परिसरात परवा रात्री दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दौलताबाद, खुलताबाद, सोयगाव परिसरालाही रात्री अकरानंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे मान्सून एकदाचा परतला म्हणत निःश्वास टाकलेल्या शेतकरी आणि नागरिकांना पुन्हा एकदा नव्या संकटाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसात झाली. औरंगाबाद शहराची तसेच खुलताबाद, दौलताबाद परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान मध्यरात्रीतून काही ठिकाणी पुरवठा सुरळीत झाला तर काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा खंडित झाले आहे. लोणीखुर्द परिसरात 17 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
(हेही वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर विचित्र अपघात! ३ जण ठार!)
दोन दिवस मुसळधार पाऊस!
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा पश्चिम भाग, कोकण किनारपट्टी वगळता कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत या पावसाची तीव्रता वाढेल. या काळात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होत जाईल आणि त्यानंतर हळू हळू थंडीची सुरुवात होईल.
Join Our WhatsApp Community