कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुरूवात केली. वर्क फ्रॉम ही नवी संकल्पना पहिल्यांदा आरामदायी वाटत होती. कामकाज सुलभतेने होत असले तरी साहजिकच यामुळे लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. त्यामुळे लवकरच याचे दुष्परिणाम सर्वांच्या समोर येऊ लागले आहेत. शारिर
इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर जास्त काळ घालवल्याने डोळ्यांवर देखील गंभीर परिणाम होतो. तासनतास एका जागी बसून काम केल्यामुळे निश्चितच कर्मचा-यांना पाठीच्या मणक्याचे आजार जास्त होऊ लागले. तसेच खूप वेळ एकाच जागी बसल्याने ‘डिप व्हेन थ्रोम्बोसिस’चा (DVT) विकार जडण्याची शक्यता देखील वाढली आहे.
(हेही वाचाः महापालिका उभारणार अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटर!)
४१ % लोकांना पाठीच्या मणक्याचे आजार
कामासाठी सतत एका ठिकाणी बसून राहणे, कामानंतर देखील बसून राहणे किंवा झोपणे यांमुळे शरीराची हालचाल न होता, तब्बल ४१ टक्के नागरिकांना मणक्याचे आजार झाले. तर, २३.५ टक्के नागरिकांना मानेशी संबंधित आजार जडल्याचे दिसून आले. असे, पीएमसी लॅबने केलेल्या अभ्यासातून हे सिध्द झाले आहे.
अयोग्य दिनचर्या
अपुरी झोप, असंतुलित आहार, व्यसनाधीनता, सलग एका जागेवर बसून राहणे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वाढता प्रभाव यांमुळे दिनचर्येत बदल होऊन दैनंदिन आयुष्यात कमालीची विसंगती निर्माण झाली आहे. यामुळेच मानसिक आजारदेखील बळावत आहेत.
(हेही वाचाः मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स डिलीट झाले तर कसे मिळवाल? वाचा)
अशी घ्या आरोग्याची काळजी
- पीएमसी रिपोर्टनुसार सलग एक तास एक काम केल्यास ६ मिनीटे ब्रेक घेणे.
- रोज जास्तीत जास्त चालून, योगाभ्यास व व्यायाम करण्यावर भर देणे
- डोळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रोटेक्शन ग्लासेसचा वापर करणे
- जास्तीत-जास्त पाणी प्या
- शरीराचे वजन नियंत्रित ठेवा
- धूम्रपान व इतर व्यसने टाळा