मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातील एक नाव सुरेश पुजारी याला फिलिपाईन्समध्ये अटक करण्यात आली असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. सुरेश पुजारी मागील अडीच ते तीन वर्षांपासून फिलिपाईन्समध्ये सुरेश पै नावाने राहत होता. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन आणि डिपार्टमेंट ऑफ जुरीडिक्शन यांच्या संयुक्त कारवाईत सुरेश पुजारीला फिलिपाईन्समधून अटक करण्यात आली आहे.
१५ जणांना मागील काही वर्षांत अटक करण्यात आली
सुरेश पुजारी विरुद्ध मुंबईत १८ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २००७ मध्ये सुरेश पुजारी हा भारतातून पळून गेला होता. मुंबई पोलिसांनी सुरेश पुजारी टोळीतील १५ जणांना मागील काही वर्षांत अटक करण्यात आलेली आहे. २०२० मध्ये तो आपल्या एका प्रेयसीसोबत फिलिपाईन्समध्ये लपून बसला असल्याची माहिती मुंबई पोलिसांना यापूर्वी मिळाली होती. सीबीआयने सुरेश पुजारी विरोधात रेड कोर्नर नोटीस देखील काढली आहे.
(हेही वाचा : आता आर्यन खानसाठी शिवसेनेची न्यायालयात धाव)
सुरेश पुजारी धमक्या देण्यासाठी इंटरनेट कॉलवर बोलतो
सुरेश पुजारी याच्याविरुद्ध ठाणे पोलिस आयुक्तालयाचा हद्दीतील अनेक पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये नुकताच त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. सुरेश पुजारी हा साधा मोबाईल फोन वापरत असून धमक्या देण्यासाठी तो इंटरनेट कॉलवर बोलतो. या इंटरनेट कॉलिंगसाठी त्याने दुसऱ्या देशातील मोबाईल क्रमांक वापरत आहे. इतर बँकेच्या व्यवहारासाठी त्याने एक स्मार्ट फोन ठेवला असून त्या माध्यमातून तो बँकेचे व्यवहार करीत होता, अशी माहिती समोर आली आहे. फिलिपाईन्समधून अटक केल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community