हिंदी राष्ट्रभाषा नाही…झोमॅटोवरुन ‘असा’ झाला वाद सुरु

हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं सांगत नेटक-यांनी #HindiIsNotNationalLanguage हा ट्रेंड सुरू केला आहे.

117

झोमॅटो ही फूड डिलीव्हरी कंपनी नेहमीच चर्चेत असलेली कंपनी आहे. मागच्या वेळी झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयने फूड पाकीट उघडून त्यातील पदार्थ चोरुन खाल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

झोमॅटोच्या डिलीव्हरी बॅायला एका सूपची डिलीव्हरी करायला उशीर झाल्याने संबंधित ग्राहकाला उशीर का झाला याचं कारण देताना त्याने सांगितले की, हॅाटेलच्या कर्मचा-याला हिंदी समजत नसल्याने ऑर्डर वेळेवर देता आली नाही. त्याने ग्राहकासोबत झालेल्या आपल्या या संभाषणादरम्यान पुढे म्हटलं की, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि ती सर्वांना थोडी तरी यायला हवी. त्या ग्राहकाने आपल्या या चॅटचा स्क्रिनशॅाट सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता भाषेवरुन वादळ उभे राहिले. अनेक युजर्सने भाषेचा बोजा ग्राहकांवर लादला जात असल्याची टीका करायला सुरुवात केली.

हिंदी समजत नसल्याने झाला घोळ 

सोमवारी, झोमॅटोच्या विकास नावाच्या  ग्राहकाने झोमॅटो कंपनीच्या एक्झिक्युटिव्हशी केलेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट ट्विट केले. स्क्रीनशॉटनुसार  विकासला त्याची ऑर्डर वेळेवर मिळत नव्हती, त्यामुळे त्याने एक्झिक्युटिव्हला रेस्टॉरंटमध्ये चौकशी करायला सांगितली. त्याच्या उत्तरादाखल  झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने विकासला कळवले की, त्यांनी पाच वेळा रेस्टॉरंटला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भाषेच्या अडथळ्यामुळे कर्मचार्‍यांशी संवाद साधता आला नाही.

त्यानंतर ग्राहकाने सांगितले की, जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे, तर त्यांनी भाषा समजण्यासाठी तमिळ भाषिक व्यक्तीची नेमणूक केली पाहिजे. डिलीव्हरी करायला उशीर झाल्याने विकास या ग्राहकाने पैसे परत करा असं सांगितलं असता, झोमॅटोच्या अधिका-याने उत्तर दिले की, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. त्यामुळे सर्वांना थोडेसे हिंदी माहित असावे हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे भाषेच्या या गैरसमजासाठी पैसे परत दिले जाणार नाहीत. या संपूर्ण संभाषणाचा स्क्रिन शाॅट विकास या ग्राहकाने ट्विटरचा आधार घेत आपला मुद्दा मांडला.

त्यानंतर आता हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं नेटकरी ट्रेंड करत आहेत. #HindiIsNotNationalLanguage .

खरेच हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का ?

भारताच्या संविधानानुसार, कलम 343 अंतर्गत हिंदी ही भाषा भारताची अधिकृत भाषा आहे. पण, ती राष्ट्रभाषा नाही.  भारतात हिंदी भाषा ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.