बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार वाढत आहेत, हल्ले वाढत आहेत. त्याबाबत भारतातील मानाधिकार संघटना मात्र मूग गिळून गप्प आहेत. अफगाणिस्तानमध्येही तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर तेथील शिखांना धोका निर्माण झाला. काहींना ठारही मारले आणि सुमारे ४०० ते ५०० शीख तेथून भारतात आले. बांगलादेशात स्वातंत्र्याच्यावेळी हिंदूंचे प्रमाण २४ टक्के इतके होते, ते आता ८ टक्क्यांवर आले आहे, तर पाकिस्तानात हे प्रमाण ८ -९ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आले आहे. भारताने या देशांना हे आत्याचार थांबवण्यास सांगितले पाहिजे. तसेच युनोमध्ये लक्ष वेधू शकतो, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
सीमावर्ती भागामध्ये यांच्यामुळे गुन्हेगारी फोफावली
स्ट्रॅटेजिक सेंटरच्यावतीने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. भारताबाहेरील देशांमध्ये हिंदूवर होणारे आत्याचार पाहता भारताने अलीकडेच मांडलेल्या सीएए या कायद्याचे महत्त्वही काय आहे, ते अधोरेखित होते, असे सांगत बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार, सीमेवर सीमासुरक्षा दलाच्या अधिकारांमध्ये करण्यात आलेली वाढ, काश्मीरमधूनही झालेले हिंदूंचे पलायन, चीन आणि पाकिस्तान यांनी भारताविरोधात सतत हायब्रीड युद्धच पुकारलेले आहे, त्याची स्थिती, याचा तपशीलवार आढावाही त्यांनी घेतला. तसेच सीमा सुरक्षेसाठी असलेले बीएसएफकडील अधिकार काय आहेत, त्याला मर्यादा काय आहेत, याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सीमावर्ती भागामध्ये सीमापारची गुन्हेगारी, गुन्हेगार-प्रशासन-पोलिस ह्या त्रयींतील संगनमताने फोफावत असते. भारतात अनधिकृतपणे स्थलांतरित प्रवेश करणारे काही महत्त्वाची कागदपत्रे बनावटपणे कशी तयार करतात आदींबाबतही असणारी भयावह स्थिती ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी यावेळी मांडली.
(हेही वाचा : …तर हिंदू महासभा हा दुसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आला असता!)
Join Our WhatsApp Community