समाजमाध्यमांवर ‘सोशल’ होणं ‘सोसत’ नाही… इतके वाढले गुन्हे

अनेकवेळा केवळ अफवा उठवून समाजातील वातावरण कलुषित केले जात आहे.

146

गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमांचे जाळे वेगाने पसरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे ज्ञानार्थी होण्यापेक्षा तरुण वर्ग दैनंदिन जीवनात आपण काय करतो, याची टाईमलाईन पोस्ट करण्यात अधिक उत्साही असतो. त्यांचं हेच अधिक सोशल होणं कालांतराने सोसना झालं आहे.

समाजमाध्यमांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अनेक लोक समाजातील प्रत्येक घटनेवर आपले मत नोंदवतात. व्हिडिओद्वारे मतप्रदर्शित करणे, प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमांचा वापर करणे, यामुळे तिढा निर्माण होऊन समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरात वाढ झाली आहे. अनेकवेळा केवळ अफवा उठवून समाजातील वातावरण कलुषित केले जात आहे.

(हेही वाचाः फेसबूकचं पुन्हा होणार बारसं? लवकरच होणार निर्णय)

आक्षेपार्ह व प्रक्षोभक संदेश

वर्षभरात समाजमाध्यमांवर धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे ४५ हजार संदेश मुंबई पोलिसांना सापडले आहेत. तर, महाराष्ट्र सायबर विभागाला जवळपास दहा हजार आक्षेपार्ह संदेश आढळले. याप्रकरणी आतापर्यंत राज्यात ७५ व मुंबईत १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रक्षोभक संदेशांवर देखील सायबर विभाग सतत लक्ष ठेऊन असतो.

प्रक्षोभक संदेश हटवले

ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या सोशल मीडिया लॅबने 26 हजार 777 प्रक्षोभक संदेश हटवले आहेत. याशिवाय, कोरोना काळात चुकीची माहिती देणारे जवळपास 1 हजार 855 संदेश समाजमाध्यमांवर पसरले होते. या संदेशांमध्ये कोरोनाविषयक खोट्या बातम्या, दहशतवादाचे समर्थन, धमकावणारे, पोलिसांविरोधात अपप्रचार करणारे, धार्मिक किंवा जातीय तेढ वाढवणा-या आक्षेपार्ह संदेशांचा समावेश होता.

(हेही वाचाः आर्यन खानचे सर्च सजेशन गुगलवरुन झाले ‘गूल’)

पोलिस पथक सक्रिय

फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर या माध्यमांवर पसरणा-या आक्षेपार्ह संदेशांवर ३० पोलिसांचे पथक व महाराष्ट्र सायबर विभागाकडून २४ तास विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा तसेच सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी इंटरनेटवरील संशयित संदेशांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.