फॉरेन टूरचा विचार करताय? मग वाचा कोणत्या देशांमध्ये कसे आहेत नवे नियम

फ्लाइट आणि हॉटेल्स बूक करण्यापूर्वी संबंधित देशांच्या नियमांबद्दलचे अपडेट जाणून घ्या.

143

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विविध देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्ट्यांचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. अशाच काही देशांची आम्ही तुम्हाला देत आहोत, जिथे आता प्रवाशांना विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. पण, फ्लाइट आणि हॉटेल्स बूक करण्यापूर्वी संबंधित देशांच्या नियमांबद्दलचे अपडेट जाणून घ्या.

पॅराग्वे- प्रवाशांकडे वैद्यकीय COVID-19 LAMP, NAAT किंवा RT-PCR चाचणी रिपोर्टसह वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जे देशात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आधी घेतलेले असावे. प्रवाशांकडे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय विमा आसणे आवश्यक आहे.

व्हेनेझुएला- देशात प्रवेश करणा-या सर्व प्रवाशांनी फ्लाइटमध्ये चढण्याच्या 48 तास आधी नकारात्मक कोविड-19 आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. प्रवेश केल्यावर कोविड -19 चाचणी केली जाईल.

इजिप्त-  या देशात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोविड-19 साठी नकारात्मक आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे.

दक्षिण आफ्रिका- 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांनाच दक्षिण आफ्रिकेत प्रवेश दिला जाणार आहे. नकारात्मक कोविड-19 पीसीआर चाचणीचा रिपोर्ट सोबत असणे आवश्यक आहे.

फ्रान्स- भारताला फ्रान्सच्या रेड यादीतून काढून टाकण्यात आले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्यास तुम्ही कोणत्याही निर्बंधांशिवाय फ्रान्सला जाऊ शकता. 72 तासांपूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट सोबत असणे आवश्यक आहे.

जर्मनी- भारतीय प्रवासी, ज्यांनी कोविड -१९ लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा जे व्हायरसमधून बरे झाल्याचा पुरावा दाखवू शकतात, त्यांना जर्मनीत आल्यावर विलगीकरणात राहण्याची गरज भासणार नाही.

रशिया- रशियात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनी नकारात्मक कोविड -19 पीसीआर चाचणीचा निकाल येण्यापूर्वी 72 तास आधी जारी करणे आवश्यक आहे.

स्वित्झर्लंड- संपूर्ण लसीकरण झालेले किंवा व्हायरसमधून बरे झालेले प्रवासी स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करू शकतात. लसीकरण प्रमाणपत्र/मागील संसर्गाचा पुरावा आवश्यक आहे. त्यानंतर कोणतीही चाचणी किंवा विलगीकरणात ठेवले जाणार नाही.

मालदीव- प्रवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.

श्रीलंका- केवळ पूर्णपणे लसीकरण केलेले भारतीय श्रीलंकेत प्रवेश करू शकतात. देशात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांपूर्वीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.