देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यात आता भाज्यांचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता खायचं काय आणि जगायचं कसा असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर असतानाच, आता खाद्य तेलांच्या किंमती कमी झाल्याने किमान महागड्या फोडणीचा ठसका तरी गृहिणींना लागणार नाही.
दिवाळीच्या उंबरठ्यावर खाद्यतेल स्वस्त झाल्याने दिवाळीआधीच सर्वसामान्यांचे तोंड गोड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यापार निर्बंध कठोर असल्याने, तसेच व्यापार ठप्प झाल्याने खाद्य तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलाची किंमत कमी झाली असल्याचं पहायला मिळत आहे.
केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
दिवाळीच्या सणाला फराळ तसेच रोषणाई करण्यासाठी तेलाच्या मागणीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या साठ्यावर निर्बंध घालून सोयाबीन, सुर्यफूल, पाम तेलावरील कृषी उपकर आणि सीमाशुल्क कमी केले आहे. यामुळेच सोयाबीन आणि सुर्यफूल या तेलांच्या दरांत १५ किलोच्या डब्यामागे १०० रुपयांची घसरण झाली आहे.
भारतात खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी
भारतात सणवार आणि विविध खाद्यसंस्कृतीमुळे खाद्यतेलाला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी दीडशे लाख टन तेल आयात केलं जातं, तर ८० लाख टन तेलाची निर्मिती भारतात केली जाते.
Join Our WhatsApp Community