मालवणी हा भाग आता मुसलमान बहुल बनला आहे, त्यामुळे या भागातून उरल्या सुरल्या हिंदूंना हाकलून लावण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा आरोप मध्यंतरी झाला होता. तेव्हापासून हा भाग चर्चेत आला आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या भागाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. ‘या ठिकाणच्या हिंदूंना भेटून आम्ही त्यांनी पाठिंबा देणार आहोत’, असे राणे यांनी जाहीर केले होते. आता राणे यांनी थेट मलावणीतच ‘गर्व से कहो हम हिंदू है’, अशा आशयाचा बॅनर लावून एक प्रकारे या भागात हिंदुत्वाची गर्जना केली आहे.
These hoardings come up in Malvani Mumbai!
That’s the spirit!! @MPLodha @RSSorg @Dev_Fadnavis @BJP4Mumbai @CTRavi_BJP @Sunil_Deodhar pic.twitter.com/Zg3pdhLI3w— nitesh rane (@NiteshNRane) October 21, 2021
मालवणी पोलिस ठाण्यात धडक
मालवणी विभागात धर्मांध गुंडांकडून हिंदू रहिवाशांना धमकावले जात असल्याचा आरोप करीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, तसेच आमदार नितेश राणे यांनी मालवणी पोलिस ठाण्यात धडक मारून पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी मालवणीत असे बॅनर दिसत आहेत. ‘बांगलादेशप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहेत. त्यामुळे मालवणी भागातसुद्धा भीतीचे वातावरण आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देऊन हिंदूंना हिम्मत देणार आहोत’, असे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट देखील केले होते.
(हेही वाचा : बांगलादेशातील जातीय हिंसाचाराला कारणीभूत मुसलमानच! )
मंत्री अस्लम शेख यांचा मतदार संघ
मालवणी हा भाग मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा मतदार संघ आहे. या भागात सुरु असलेल्या धर्मांध मुसलमानांच्या गुंडगिरीच्या विरोधात मधल्या काळात मंत्री अस्लम शेख यांना माध्यमांकडून विचारणा झाली होती, मात्र तेव्हा त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मालवणीत हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे म्हणत त्यांनी स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता.
Join Our WhatsApp Community