इंडोनेशिया हा जगातील बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. मशिदीवर असलेल्या भोंग्यांच्या आवाजाने अनेक लोक त्रस्त होत असतात, याच पार्श्वभूमीवर इंडोनेशियाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इंडोनेशियातील ७० हजार मशिदींवरील भोंग्यावरील आवाजावर निर्बंध लावण्यात आले आहेत. या आवाजामुळे अनेक मानसिक समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत होता. इंडोनेशियात जवळपास ७.५ लाख मशिदी आहेत. या मशिदींमध्ये दिवसातून पाच वेळा आजान होत असते. या भागात मध्यम जागेत डझनभर भोंगे आहेत. २०१८ मध्ये एका बौध्द महिलेने भोंग्यांच्या आवाजाला कंटाळून याविरुध्द आवाज उठावला होता, तेव्हा तिला तुरूंगात डांबले होते.
काय आहे हा निर्णय?
अलिकडेच, इंडोनेशिया मशिद परिषदेला या संदर्भात काही ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी जकार्ता येथील मशिदीवरील भोग्यांचे ध्वनी नियंत्रण करण्यास सुरुवात केली. जेणेकरून, लोकांना आजानचा आवाज ऐकू येणार नाही. या देशातील जवळपास अर्ध्या मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनीप्रदूषण होत आहे, ज्यामुळे आरोग्याची समस्या वाढली आहे, असे मशिद परिषदेचे अध्यक्ष जुसुफ कल्ला यांनी स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून, भोंग्यांच्या आवाजामुळे समाजाची समस्या सोडवण्यासाठी ७ हजार तंत्रज्ज्ञ कार्यरत आहेत आणि ७० हजार मशिदींवरील भोंग्यांचे ऑडिओ दुरुस्त करण्यात आले आहेत. यामुळे इंडोनेशियामधील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आता कमी झाला आहे.
(हेही वाचा : बांगलादेशातील जातीय हिंसाचाराला कारणीभूत मुसलमानच!)
भारतात निर्बंध कधी?
सर्वोच्च न्यायालयाने ‘ध्वनी प्रदूषण नियमन अधिनियम २०००’ च्या आवाजावर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार मशिदीवरील भोंग्यांना आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते, म्हणून त्याविरोधात त्या त्या राज्यांतील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यामुळे त्या त्या प्रकरणावरून त्या त्या ठिकाणच्या मशिदींवरील भोंग्यावर कारवाई करण्यात आली आहे, परंतु इंडानेशियाप्रमाणे भारतात सरकारी पातळीवरच मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनी प्रदूषणावर कारवाई करण्याची धमक दाखवली जात नाही, त्यामुळे इंडोनेशियातील मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसे भारतात मात्र मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात आले नाही.
Join Our WhatsApp Community