उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात उघडपणे इस्लाम धर्माचा प्रचार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. येथील काही मुस्लिम व्यापारी ग्राहकांना देण्यात येणा-या बिलाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर शहराचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
साधारणपणे दुकानदाराकडून ग्राहकाला मिळणा-या बिलावर दुकानाचे नाव, सामानाचा तपशील आणि दर हा मजकूर छापण्यात येतो. पण कानपूरमधील काही मुस्लिम व्यापारी, बिलावर जिहादी भाषा छापून इस्लाम धर्माचा प्रसार करत आहेत.
काय आहे बिलावरील मजकूर?
हाती आलेल्या काही बिलांवर मोबाईल नंबर, सामानाचा तपशील यांबाबत माहिती छापली आहे. बिलाच्या शेवटी Islam The only solution, असा मजकूर छापण्यात आला आहे. इस्लाम हा एकमेव उपाय आहे, असा या मजकूराचा अर्थ होतो.
शोध सुरू
जिहादी संदेश देणारी बिलाची कॉपी सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती शहराचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी दिली आहे. काही व्यापा-यांची नावे समोर आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सध्या एआययूला सतर्क करून अशी जिहादी भाषा वापरणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
Dawah through business. This from a shop in Kanpur pic.twitter.com/k4EyjdCRGs
— Swati Goel Sharma (@swati_gs) October 20, 2021
कारवाईच्या भीतीने मोबाईल बंद
ज्या दुकानदारांचे मोबाईल नंबर बिलाच्या स्लिपवर लिहिलेले आहेत त्यांनी तपास सुरू झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने आपले मोबाईल नंबर बंद करुन ठेवले आहेत. मेस्टन रोडवरील रबर दुकानदाराशी संबंधित बिलाची कॉपी असल्याचे समोर आले आहे.
एका आयएएस अधिका-याची चौकशी
यापूर्वी अशा भाषेचा वापर उत्तर प्रदेश राज्य परिवहन निगमचे अध्यक्ष आणि कानपूरचे पूर्व मंडल आयुक्त मोहम्मद इफ्तिखारुद्दीन यांनी केला होता. कानपूर येथे तैनात असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोहम्मद इफ्तिखारुद्दीन एसआयटीच्या चौकशीत दोषी आढळले होते. एसआयटीने आपला चौकशी अहवाल 19 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश सरकारला सोपवला आहे. यावर आता सरकारकडून कारवाई करण्यात येईल. 26 सप्टेंबर रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये इफ्तिखारुद्दीन यांच्यासोबत एक जण धर्मांतरणाची चर्चा करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीचे गठन केले होते.
Join Our WhatsApp Community