दिवाळी निमित्त मुंबईतील सर्व बाजारपेठा फुलून गेल्या असून, दिवाळी पूर्वीचा सेकंड लास्ट रविवार आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडणार आहेत. मात्र, खरेदीचा हा तसा शेवटचा रविवार मानला जात असून, त्यामुळे खरेदीला बाहेर पडणाऱ्यांना मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने, नागरिकांसाठी हा रविवार मेगाब्लॉक ठरणार, की मेगाहाल ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक असून, हा मेगाब्लॉक सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर, मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान दोन्ही धिम्या मार्गांवर आणि हार्बरच्या पनवेल ते वाशी या अप व डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना महापालिकेचे ‘अभय’, पण स्थानिकांना ‘भय’)
कुठल्या मार्गावर होणार मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे
सांताक्रुझ ते गोरेगाव
वेळ :सकाळी १० ते दुपारी ३
मार्ग : अप आणि डाऊन जलद मार्ग
जलद लोकल फेऱ्या अप व डाऊन धिम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे
ठाणे ते कल्याण
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ४
मार्ग : अप व डाऊन धिमा मार्ग
धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप व डाऊन जलद मार्गावरून वळवणार.
(हेही वाचाः रेल्वे आत्महत्यांमध्ये वाढ… गेल्या 9 महिन्यांत इतक्या घटना वाढल्या)
हार्बर मार्ग
पनवेल ते वाशी
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ४
मार्ग : अप व डाऊन
पनवेल येथून सीएसएमटी दिशेला सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान धावणाऱ्या अप व डाऊन लोकल फेऱ्या बंद राहतील.
सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी या लोकल फेऱ्या सुरू राहतील.
Join Our WhatsApp Community