मलिकांच्या ‘या’ दोन ट्वीटने वानखेडेंच्या विरोधात उडवून दिली खळबळ!

नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा आहे. यामध्ये त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख

124

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘पहचान कौन’ असे म्हणत नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. या फोटोला ‘पहचान कौन’ अशी कॅप्शन दिली तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असे म्हणत समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली आहे. मलिकांच्या या दोन ट्वीटने समीर वानखेडेच्या विरोधात खळबळ उडवून दिली आहे.

‘आघाडी सरकारला कसे बदनाम केले जात आहे?’

एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसे बदनाम केले जात आहे, हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.

‘..यहाँ से शुरु हुआ फर्जीवाड़ा’

सोमवारी, ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे, हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा आहे. यामध्ये त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. समीर दाऊद वानखेडे…यहाँ से शुरु हुआ फर्जीवाड़ा, असे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.