टीम इंडियाच्या ‘या’ कृतीचे जगभर कौतुक

108

भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता संपूर्ण जगभरात शिगेला पोहोचली होती. भारताने हा सामना गमावल्यामुळे देशवासीयांची निराशा जरी झाली असली तरी, टीम इंडियाच्या खेडाळूंनी ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिल्यामुळे टीम इंडिया जगभरात कौतुकास पात्र ठरत आहे. या चळवळीचे समर्थन करण्यासाठी, सामना सुरु होण्याआधी भारतीय टीमचा प्रत्येक खेडाळू गुडघ्यावर बसला आहे.

‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या चळवळीला समर्थन

भारतीय संघ गुडघ्यावर बसलेला पाहताना सर्वच चकीत झाले परंतु, ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला समर्थन देण्यासाठी भारतीय संघ सामना चालू होण्यापूर्वी गुडघ्यावर बसला होता. गेल्या वर्षी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड पोलिस अधिका-याने मानेवर गुडघा दाबून हत्या केली होती. अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णियाच्या या हत्येच्या निषेधार्थ ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या नावाने आंदोलन सुरू झाले. याच, हत्येनंतर संपूर्ण जगभरात ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीने जोर धरला होता.

(हेही वाचाः नव्याने बुरुज उभा करण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे – जयंत पाटील)

‘टेकिंग द नी’ मोहीम

जगभरात होणा-या कृष्णवर्णियांच्या हत्येच्या निषेधार्थ टेकिंग द नी ही मोहीम राबवली जात आहे. गुडघ्यावर बसण्याला टेकिंग द नी (Taking the Knee) असं म्हटलं जात असून, ही मोहीम वर्षद्वेषाविरोधातील मोहिमेचं प्रतिक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.