गोरेगावमधून कुख्यात ड्रग पेडरलच्या एनसीबी पथकाने आवळल्या मुसक्या!

NCB च्या पथकाकडून एका ड्रग पेडलरला मुंबईतील गोरेगांव येथून ताब्यात

137

रविवारी संध्याकाळी गोरेगावमधून एका मोठ्या कुख्यात ड्रग पेडलरला अटक करण्यात आले आहे. NCB च्या पथकाकडून या ड्रग पेडलरला मुंबईतील गोरेगांव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली या मोठ्या कुख्यात ड्रग पेडलरला जाळ्यात अडकवण्यात आले आहे. NCB चे पथक गोरेगाव येथे दाखल होत ‘CID सीरियल स्टाईल’ने पेडलरवर नजर ठेऊन होते.

क्षणार्धात NCB पथकावर जीवघेणा हल्ला

NCB ला अनभिज्ञ असलेला ड्रग्ज पेडलर काही मालाची डिलिव्हरी करण्यासाठी येताच NCB च्या टीमने त्याला त्वरीक ताब्यात घेत पकडून त्यांच्या गाडीत बसवले. यावेळी पेडलरने गाडीच्या आतून जोर-जोरात ओरडा-ओरड देखील केली. हे लक्षात येताच काही क्षणात एका जमावाने ६ जणांच्या NCB पथकावर जीवघेणा हल्ला केला. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे NCB पथक चक्रावले. या हल्ल्यातून पथकाला सुखरूप वाचवण्यासाठी आलेल्या NCB च्या दोन अधिकाऱ्यांना हल्लेखोर जमावाने घेरले.

(हेही वाचा-आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना)

फिल्मी स्टाईलने पेडलरला केली अटक

परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे लक्षात येताच, समीर वानखडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, संयम आणि हुशारी दाखवत स्वत:चा आणि पथकाचा जीव वाचवला इतकेच नाही तर पेडलरलाही अटक केली. हे सगळं फिल्मी स्टाईलने घडले. अधिकाऱ्याने कारमध्ये बसलेल्या पेडलरला रिव्हॉल्व्हर दाखवले आणि जमावाला मागे हटण्यास भाग पाडले. जमाव मागे हटला मात्र पेडलरला सोडण्यासाठी एनसीबीच्या वाहनाला देखील घेराव घातला.

या घटनेत दोन अधिकारी गंभीर जखमी

परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे पाहून एनसीबीच्या पथकाने मुंबई पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पेडलरला अटक केले. मात्र, या घटनेत दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. वानखेडेसह इतर ६ अधिकारीही जखमी झाले आहेत. परंतु इतकी मोठी घटना घडून देखील माध्यमांनी कुठेही दाखवली नसल्याचा सवाल ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांकडून उपस्थित केला जात आहे. मुंबई पोलिसांसमोर जीवघेणा ड्रग्जचा बेकायदेशीर धंदा सुरू आहे पण पोलीस आणि ठाकरे सरकार या प्रकाराबद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.