भारत ‘चिंताजनक’ देशांच्या यादीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

135

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलांमुळे भारताचा समावेश ११ चिंताजनक देश असलेल्या यादीत झाला असून ही भारतासाठी अत्यंत गंभीरबाब आहे. जगाचे लक्ष ग्लासगो येथे होणाऱ्या २६ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आगामी हवामान बदल परिषदेवर (COP26)आहे. ही, पॅरिस परिषदेनंतरची सर्वात मोठी हवामान परिषद आहे. या परिषदेआधीच अमेरिेकेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यामुळेच या परिषदेच्या आधीच २०० देशांना त्यांनी २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या अहवालात काय म्हटले आहे?

भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा ११ देशांच्या यादीत समावेश आहे. या देशांमधील परिस्थिती उष्माघात, दुष्काळ आणि अफगाणिस्तानमधील कुचकामी सरकार यामुळे चिंताजनक आहे, असे गुप्तचर संस्थेतील अधिका-यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान हा सिंचनासाठी भारतातून उगम पावणाऱ्या हिमनद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर आणि भूजलाच्या खोऱ्यांवर सीमाबाह्य तणाव वाढण्याची शक्यता आहे. अधिक वारंवार आणि तीव्र चक्रीवादळांमुळे जलस्रोत दूषित होण्याची आणि वेक्टर लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या देशांमध्ये येत्या काळात अनेक रोग पसरु शकतात.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना)

अमेरिकेच्या सुरक्षेला धोका?

राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या कार्यालयाने (ODNI) अंदाज वर्तवला आहे की जागतिक तापमानवाढीमुळे भौगोलिक व राजकीय तणाव वाढून २०४० पर्यंत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.