उत्तरप्रदेशात मोदींचा दिवाळी धमाका! ५,२०० कोटींच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन

112

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशला दिवाळीची मोठी भेट दिली आहे. उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उत्तरप्रदेशातील काही राज्यात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे वैद्यकीय महाविद्यालये उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर, देवरिया, एटा, हरदोई, गाझीपूर, मिर्झापूर, प्रतापगड आणि जौनपूरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून एमबीबीएसच्या ९०० जागा आणि ३०० खाटा वाढवल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश याच सत्रात सुरू करण्यात येणार आहे.

२०२३ पर्यंत आणखी १४ महाविद्यालये सुरू होणार

पंतप्रधान मोदींनी सिद्धार्थनगरमधील एका कार्यक्रमाद्वारे वैद्यकीय महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाला हिरवा कंदील दिला. उत्तरप्रदेशात २०१७ ते २०२१ दरम्यान सात राज्यस्तरीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. उत्तरप्रदेश सरकारच्या मते, २०२२-२३ पर्यंत आणखी १४ वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. अमेठी, औरैया, बिजनौर, बुलंदशहर, चंदौली, गोंडा, कानपूर देहात, कौशांबी, कुशीनगर, लखीमपूर खेरी, ललितपूर, पिलीभीत, सोनभद्र आणि सुलतानपूर जिल्ह्यात ही वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मन की बात कार्यक्रमात असे सांगितले होती की, २०१४ पासून आतापर्यंत देशात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे पदवीपूर्व म्हणजेच एमबीबीएसमध्ये १६ हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. त्यापैकी ६४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत ६५०० एमबीबीएसच्या जागांवर प्रवेश सुरू झाले आहेत. यासह यूपीमध्ये पीपीपी मॉडेलवर १६ जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत. सिद्धार्थनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला माधव प्रसाद त्रिपाठी यांचे नाव देण्यात येणार असून देवरियाचे मेडिकल कॉलेज प्रसिद्ध संत महर्षी देवराह बाबा यांच्या नावाने बांधण्यात आले आहे. गाझीपूर मेडिकल कॉलेजला संत विश्वामित्र यांचे नाव तर मिर्झापूरच्या मेडिकल कॉलेजला विंध्यवासिनी देवीचे नाव देण्यात आले आहे.

(हेही वाचा –टीम इंडियाच्या ‘या’ कृतीचे जगभर कौतुक)

५,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

प्रतापगढ मेडिकल कॉलेजला पटेल समाजाचे कट्टर नेते सोनलाल पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यांची मुलगी अनुप्रिया पटेल केंद्र सरकारमध्ये मंत्री आहे. एटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला वीरांगना अवंतीबाई यांचे नाव देण्यात येणार आहे. जौनपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माजी मंत्री उमानाथ सिंह यांच्या नावाने असणार आहे. फतेहपूर मेडिकल कॉलेजला शहीद जोधा सिंग यांचे नाव देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी वाराणसीमध्ये ५ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.