मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणासंदर्भात बॉलिवूड विश्वातील किंगखान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात एकच गोंधळ उडाला. आर्यनच्या जामीन आर्जावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी सुरू आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानच्या जामीनाकरता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सुनावणीआधी न्यायालय झालं रिकामं
मंगळवारी आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावनीदरम्यान उच्च न्यायालयात गोंधळ उडाला आणि कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. या प्रसंगानंतर उच्च न्यायालयात न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे सुनावणीआधी न्यायाधीशांनी न्यायालय रिकामं केलं आणि पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला.
Justice Sambre is waiting for the court to be cleared out. Court staff asks everyone else to leave the court.
Police asks everyone to leave.#AryanKhan #BombayHighCourt
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
…आणि न्यायमूर्ती सांब्रे संतापले
मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालय आणि विशेष अंमली पदार्थ विरोधी न्यायालयाने दोन वेळा जामीन नाकारला होता. दरम्यान, मुंबईतील क्रूझ पार्टीवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्टरूमध्ये न्यायमूर्ती सांब्रे यांनी उपस्थित असलेल्या सर्वांनाच फटकारले.
(हेही वाचा- जनाब राऊत तुम्हाला नवाब मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, चित्रा वाघ यांचा आरोप)
किंगखानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर हे प्रकरण दररोज वेगळे वळण घेताना दिसतेय. त्यामुळे प्रत्येक जण या प्रकरणासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याने आर्यनच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सांब्रे संतापले. कोर्ट-रूममध्ये कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने न्यायमूर्ती सांब्रे न्यायासनावरून उठून निघून गेले असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community