वृद्धापकाळ उदरनिर्वाहासाठी ‘या’ योजनेचा आधार

126

महाराष्ट्र राज्य सरकार जेष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य्य करते. ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षावरील आहे व त्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये २१ हजार रुपयांच्या आहे. अशा व्यक्तींना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ) अंतर्गत सहाशे रुपये प्रतीमाह निवृत्ती वेतन देण्यात येते. श्रावण बाळ योजना २०२१ चे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वयाच्या ६५ व्या वर्षी ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे आहे.

वृद्धापकाळ उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत

या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि त्यांचे हाल कमी होतील. राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य हे, राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, हे आहे. वृद्धापकाळ त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून जेष्ठ नागरिकांच्या खात्यात रक्कम या योजनेअंतर्गत जमा करते.

(हेही वाचा – सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘या’ सुविधा द्या, भाजपाची मागणी)

आमदार सुनिल प्रभूंच्या पाठपुराव्याला यश

या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभू यांच्या पाठपुराव्यामुळे हनुमान नगर गाव , मालाड (पूर्व) येथे राहणाऱ्या मनोहर भिकाजी पाध्ये व माधुरी मनोहर पाध्ये यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना, या योजनेचे लाभार्थी म्हणून समावेश करण्याला संजय गांधी योजना समितीने मान्यता दिली मान्यता दिली असून, लाभार्थींना प्रत्येकी एक हजार इतके अर्थसहाय्य दरमहा प्रदान केले जाणार आहे. याबाबत पाध्ये दांपत्याने आमदार सुनिल प्रभू यांचे आभार मानले असून, दिंडोशी विधानसभेतील उर्वरित अर्ज केलेल्या जेष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळवा या करता आपण पाठपुरावा करत असल्याची माहिती आमदार सुनिल प्रभू यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.