तुम्ही चिमुकल्यांना दुचाकीवर बसवताय? वाचा नवे नियम

चिमुकले मागे बसलेली असताना दुचाकी ४० किमीपेक्षा जास्त वेगाने चालवण्यास मनाई असणार

156

तुमच्याकडे दुचाकी वाहन आहे का?, तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना दुचाकीवर बसवताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक नवा प्रस्ताव सादर केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार, लहान मुलं दुचाकीवर बसलेली असताना तुम्हाला तुमच्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. ४० किमीपेक्षा जास्त वेगाने दुचाकी चालवण्यास मनाई असणार आहे. जर दुचाकीचा वेग ४० किमीपेक्षा जास्त असेल तर तुमच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले असे समजले जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक नवा प्रस्तावामध्ये दुचाकीवरून लहानग्यांना नेतांना ९ महिन्यांपासून ४ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना कॅश हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियमावलीत नव्या नियमांसह केंद्रीय मोटार वाहन कायद्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाने मंजूर केला आहे.

(हेही वाचा -‘किचन पॉलिटीक्समधून बाहेर या’, नवाब मलिकांवर क्रांती रेडकर भडकल्या)

असे आहेत नवे नियम

  • चिमुकले मागे बसलेली असताना दुचाकी ४० किमीपेक्षा जास्त वेगाने चालवण्यास मनाई असणार आहे
  • चार वर्षापर्यंतच्या मुलांच्या संरक्षणासाठी संरक्षण कवच आवश्यक असणार आहे.
  • दुचाकीवरून लहान मुलांना नेताना क्रॅश हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.
  • नियमांचे उल्लंघन केले तर हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल.
  • दुचाकीवर जर एक व्यक्ती आणि लहान मुलं मागे बसले असेल तर त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण काळजी घेणं आवश्यक असणार आहे. अन्यथा या नियमांचं उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल.

मुलांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता झाला निर्णय

दुचाकीवरून होणाऱ्या लहान मुलांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये रस्ते वाहतूक अपघातात ११ हजार १६८ मुलांचा मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाला ३१ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या वर्षांच्या तुलनेत २०१८ मध्ये झालेल्या अपघातात मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात ११.९४ टक्के म्हणजे १ हजार १९१ एवढी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.