बुधवारी मुंबईतील दादर परिसरात तेजस्विनी बसचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बेस्ट बस मरोळ आगारातील क्रमांक २२ नंबरची असून अपघात झाल्यानंतर या बसची परिस्थिती बिकट झाल्याचे दिसतेय. या झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, तेजस्विनी बसच्या चालक-वाहकासह चार जण गंभीर जखमी झाली आहे. यासह तिघांची प्रकृती स्थिर असून गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांवर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहे. ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा-बेस्टच्या महिला प्रवाशांना दिवाळीत असं आहे ‘ऑल द बेस्ट’)
अपघातातील जखमींची नावे
- राजेंद्र- ५३ वर्ष – चालक (गंभीर जखमी)
- काशीराम धुरी- ५७ वर्षे- वाहक (गंभीर जखमी)
- ताहिर हुसेन- ५२ वर्ष- प्रवासी (गंभीर जखमी)
- रुपाली गायकवाड- ३६ वर्षे- प्रवासी (गंभीर जखमी)
- सुलतान- ५० वर्षे – प्रवासी (गंभीर जखमी)
- मन्सूर अली- ५२ वर्षे – प्रवासी (प्रकृती स्थिर)
- श्रावणी म्हस्के- १६ वर्षे – प्रवासी (प्रकृती स्थिर)
- वैदई बामणे- १७ वर्षे – प्रवासी (प्रकृती स्थिर)