आशियामध्ये प्रथमच, सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधांसह कंटेनर-आधारित मोबाइल रुग्णालये भारतात विकसित केली जाणार आहेत. ही आधुनिक रुग्णालये, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी रेल्वे किंवा हवाई मार्गाने त्वरीत हलवता येतील, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत ही तरतूद असेल.
चेन्नई आणि दिल्लीत तैनात
विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी या कंटेनर-आधारित मोबाइल रुग्णालये फायदेशीर ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत अनेक साथीच्या रोगांवर मात करणे शक्य आहे. ही, रुग्णालये चेन्नई आणि दिल्ली येथे तैनात केली जातील. जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे, हवाई किंवा इतर मार्गाने सेवा पुरवणे सोयीचे होईल. पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी निदर्शनास आणून दिले की हे मिशन भविष्यातील कोणत्याही उद्रेकांना तोंड देण्यासाठी आरोग्य सेवा क्षेत्र तयार करेल.
(हेही वाचा-अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस आवश्यक!)
क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक्स
प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या ६०२ जिल्ह्यांमधील क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक्सच्या विकासामुळे जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनवले जाईल. या ब्लॉक्समुळे इतर आवश्यक आरोग्य सेवांमध्ये व्यत्यय न आणता संसर्गजन्य रोगांवर उपचार करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील क्षमता वाढवणे शक्य होईल.
Join Our WhatsApp Community