जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे ‘दात घशात गेले!’

'केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवारला केलं बदनाम'

111

जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. ‘जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही.’, असेही शेलार म्हणाले.

(हेही वाचा -दादरमध्ये ‘तेजस्विनी बस’ला अपघात; चालक-वाहकासह चार जण गंभीर)

मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली? जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती.

राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवारला बदनाम

मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

‘गैरसमज पसरविणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी’

शेतकऱ्यांच्या हिताच्या कोणत्याच योजना राज्यात राबवायच्या नाहीत आणि आहेत त्या योजनाही राजकारण करून बंद पाडत शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल अंगलट आला असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभच झाल्याचा घरचा आहेर देऊन सरकारच्या जलसंधारण विभागानेच शेतकरीविरोधाचा सरकारी चेहरा उघड केल्याने या योजनेविषयी गैरसमज पसरविणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.