टेक्नोलॉजीवर अवलंबून राहणं ‘या’ देशाला पडलं महागात!

131

संपूर्ण जग सध्या टेक्नोलॉजीवर अवलंबून आहे. एका क्लिकवर चूटकीसरशी सगळी कामे सुलभ झाली आहेत. पण हीच टेक्नोलॉजी जर बंद पडली तर… याचा संपूर्ण जगाला एक ताजा अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वी व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम तसेच फेसबुक ठप्प पडले होते. तेव्हा सगळ्यांची तारंबळ उडाली होती. लोकांची महत्त्वाची कामं अडकली होती. आता असाच एक प्रकार मंगळवारी इराणमध्ये घडला आहे. संपूर्णपणे टेक्नोलॉजीवर अवलंबून राहणं इराणला महागात पडलं आहे.  इराणच्या सर्व गॅस स्टेशन्सवर सायबर हल्ला झाला. त्यामुळे चक्क संपूर्ण इराण बंद पडलं.

काय आहे नेमके प्रकरण

या सायबर हल्ल्यात इंधन सबसिडी व्यवस्थापित करणारी सरकारी यंत्रणा ठप्प झाली आणि वाहनचालकांच्या गॅस स्टेशनवर लांबच्या लांब रांगा लागल्या. संतप्त इराण नागरिकांनी या विरोधात निदर्शने केली, सुरक्षा दलांनी यात शेकडो नागरिक मारले गेल्याची नोंद केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांना टॅग करुन लोक गॅस कुठे आहे ? असा प्रश्न विचारत आहेत. तेल मंत्रालयाचे अधिकारी या तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी आपत्कालीन बैठका घेत आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

(हेही वाचा – दादरमध्ये ‘तेजस्विनी बस’ला अपघात; चालक-वाहकासह चार जण गंभीर)

याआधीही झाले असे तीव्र आंदोलन 

इराणच्या सेमीऑफिशियल ISNA या न्यूज एजन्सीने या घटनेला सायबर अटॅक म्हटले आहे.  सरकारने जारी केलेले कार्ड वापरून मशीनद्वारे  इंधन खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना सायबर अटॅक 64411 असा  संदेश मिळत असल्याचं या न्यूज एजन्सीचंं म्हणणं आहे.अलीकडेच हा देश  इंधन स्मार्ट कार्डद्वारे खरेदी करण्याची यंत्रणा चालू केली आहे. इराणमध्ये 2019 ला इंधनांच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. तेव्हा अशाचप्रकारचे व्यापक आंदोलन करण्यात आले होते. आता त्याच्या दुस-या वर्धापन दिनाच्या आधी हा सायबर हल्ला झाल्याने इराणमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.