मनसे घेतेय भाजपशी जुळवून!

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भाजप भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

107

आगामी महापलिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांची युती होण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता मुंबईत मनसेने, भाजपशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी मागील आठवड्यात रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. तर त्याच्या दोन दिवस अगोदर ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांची भेट घेतली होती. ही भेट कांजूरमार्ग पूर्व-पश्चिम रेल्वे मार्ग पादचारी पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत असली तरी मनसेच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भांडुपमधील मनसेच्या माजी नगरसेविका वैष्णवी सफरे, विक्रोळी विधानसभा सचिव पृथ्वीराज येरूणकर, शाखाध्यक्ष गॉडफ्री डीसुजा यांनी ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांची भेट घेतली. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी ही भेट महापलिका ‘एस विभाग’ कार्यालय ते दातार काॅलनी जोडणारा आणि कांजूरमार्ग-भांडुप पूर्व-पश्चिम यांना जोडणारा आणि रेल्वेमार्गावरुन जाणारा पादचारी पूल महापालिकेने मंजूर केल्यानंतर तसेच आवश्यक लागणाऱ्या विविध खात्याच्या व रेल्वेची परवानगी मिळूनही या पादचारी पुलाचे काम राजकीय आकसापोटी केले जात नाही, या संदर्भात घेतली होती.

MNS BJP 1

(हेही वाचा- उल्हासनगरमध्ये भाजपाला खिंडार! पालिकेतील २२ नगरसेवकांची राष्ट्रवादीत एन्ट्री)

‘काँग्रेस-राष्ट्रवादीच पाप मी निस्तरतोय’

या भेटीनंतर दोनच दिवसांत म्हणजे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी घेतली. मागील अकरा वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याच्या मागणीबाबतचे निवेदन त्यानी गडकरी यांना दिले आहे. यावेळी मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिलेही त्यांच्यासोबत होते. यावेळी बोलतांना त्यांनी, काँग्रेस-राष्ट्रवादीच पाप मी निस्तरतोय. पण माझे वैयक्तिक लक्ष आहे या रस्त्यावर. मी कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार आहे. माझा शब्द आहे हा आणि मी शब्द पाळतो. म्हणुनच कामाची गती वाढवण्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडलाय त्या दोन्ही कंत्राटदाराला मी बदलतोय. काळजी करू नका, असे आश्वासन दिले.

एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी पाठवले आहे हे कळल्यावर त्यांनी आवर्जुन त्यांची चौकशी केली आणि विषय समजुन घेऊन “साहेबांना सांगा हा विषय मी लवकरच संपवतोय” असा निरोपही शिष्टमंडळाला दिला. आजवर मनसेच्या कोणत्याही शिष्टमंडळाने भाजप आमदार, खासदार, मंत्री यांची भेट घेतलेली नाही. परंतु महापलिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी वाढणारी मनसेची जवळीक खूप काही संकेत देत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.