भंगार विक्रीत ठेकेदारांची हातचलाखी: स्थायी समितीने केला हा आरोप

मुंबई अग्निशमन दल कुठल्याची भंगार सामानाचा लिलाव करत नसून हा लिलाव विदयुत व यांत्रिकी विभागाने केला आहे. यामध्ये ज्या ज्या कंत्राटदारांची नावे देण्यात आली आहे, त्यासर्वांचे पत्ते एकच आहेत, एकाच कंपाऊंडमधील आहेत. तयामुळे या सर्वांचे साठेलोठे आहे.

116

मुंबई महापालिकेच्यावतीने भंगारात निघालेल्या वस्तू लिलावात खरेदी करण्याचे एक मोठे रॅकेट असून काही ठराविक व्यक्तीचे बोगस कंपन्या थाटून अशाप्रकारे महापालिकेच्या डोळ्यात धुळफेक करत फसवणूक करत असल्याचा आरोपच स्थायी समितीत करण्यात आला आहे. भंगार विकत घेणाऱ्या याच या कंपन्या इमारतींचे बांधकामाचे पाडकाम आणि पार्किंगचे कंत्राट घेण्यातही सक्रिय असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील जुनी वाहनांच्या भंगार कामाच्या लिलावाची चौकशी करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे. तसेच त्यासंदर्भातील ठेकेदारांची यादी रद्द करण्याचेही निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई अग्निशमन दलातील वापरात नसलेल्या वाहनांची ई लिलाव प्रक्रियाद्वारे भंगार विक्रीच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव समिती पुढे मंजुरीला आला होता. यामध्ये जानेवारी २०१७पासून २०१८पर्यंत ८१ वाहने आणि २५ उपकरणे भंगारात काढल्याने यातून २ कोटी १४ लाख ४९ हजार रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. सभागृहनेत्यांनी आपल्या उपसूचनेमध्ये यातील ठेकेदार ए ए ऑक्शनीयर अँड कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी आल्या असून गरीब नवाज ही कंपनीही त्यांचीच आहे.त्यांचा सर्वांचा पत्ता एकच असून मालकही एकच आहे. लिलावाची रक्कम निश्चित करणाराही एकच आणि बोली लावणाराही तोच लाभार्थी आहे. त्यामुळे या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली.

(हेही वाचा-पहिल्याच प्रत्यक्ष सभेत भाजपाच्या नगरसेवकांना मास्क लावण्याचा पडला विसर!)

मुंबई अग्निशमन दल कुठल्याची भंगार सामानाचा लिलाव करत नसून हा लिलाव विदयुत व यांत्रिकी विभागाने केला आहे. यामध्ये ज्या ज्या कंत्राटदारांची नावे देण्यात आली आहे, त्यासर्वांचे पत्ते एकच आहेत, एकाच कंपाऊंडमधील आहेत. तयामुळे या सर्वांचे साठेलोठे आहे. १५ वर्षे या टोळीने कोट्यवधी रुपयांना लुटले आहे. जिथे तिप्पट दर यायला हवा, तिथे फारच कमी आला असून यामध्ये महापालिकेचे अधिकारीही सामील असल्याचा आरोप भाजपचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. यासंदर्भात आपण महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी भंगारा कामांमधील ही लॉबी इमारत बांधकाम तोडकामांच्या कंत्राटातही सामील असल्याचे सांगून या दोन्ही विषयांसाठी स्वतंत्र धोरण बनवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आपणही यापूर्वीच पत्र देवून अशाप्रकारे ई लिलाव केलेल्या कंत्राट कामांची चौकशी करण्याची सूचना केल्याचे सांगितले. अशाप्रकारे ई लिलावात भाग घेवून भंगार खरेदी करणाऱ्या २९ ते ३० कंपन्या आहेत. त्या सर्वांचे पत्ते एकच आहे. आणि रईस शेख यांनी सांगितल्या प्रमाणे ते धोकादायक इमारत पाडण्याच्या कंत्राटातही भाग घेतात आणि वाहन पार्किंगची कामे जी महिला बचत गटांच्या माध्यमातून घेतली जातात, त्यातही हीच मंडळी आहे. हे एक मोठे रॅकेट असून पार्किंगच्या कंत्राटातही त्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे यांच्याशिवाय ते अन्य कुणाला यामध्ये शिरकाव करून देत नाही. आणि जर कुणी प्रवेश केला तर न्यायालयापर्यंत धाव घेतात. त्यामुळे यांच्याविरोधात कायदेशी कारवाई करण्यात यावी. त्यामुळे या ई लिलाव पध्दतीची चौकशी करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि जी महापलिकेची अधिकृत ठेकेदारांची यादी आहे ती त्वरीत रद्द करण्यात यावी असेही निर्देश प्रशासनाला देत हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.