करी रोड येथील वन अविघ्न पार्कमधील टॉवरला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेत बचाव कार्य करताना, आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचा आरोप होत होता, परंतु येथील यंत्रणा कार्यान्वित असून, पुरेशा दाबाने पाण्याचा मारा होत नव्हता. अग्निशमन दलाने यंत्रणा हाताळल्यानंतर त्यातून अधिक दाबाने पाण्याचा मारा होऊ लागला असून, याबाबत अतिरिक्त आयुक्त(शहर) यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः मुंबईत टोलेजंग इमारती किती? अग्निशमन दलाकडेच आकडेवारी नाही)
रवी राजा यांचा आरोप
मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने खेरदी करण्यात येणाऱ्या फायर बाईक्सच्या संदीर्भातील प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अविघ्न इमारतीमध्ये जेव्हा आग लागली होती, तेव्हा तेथील फायर यंत्रणाही कार्यान्वित नव्हती, असा आरोप केला. तसेच यंत्रणा सुरू झाल्यानंतर त्यातून पाणीच येत नव्हते, अशी माहिती समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पिंक्रर्स चालू नव्हते, त्यामुळे ज्यांच्या घरी ही आग लागली ते जरी जबाबदार असले तरी या इमारतीचा मालक, विकासकच अधिक जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे २४ विभाग कार्यालयांमध्ये एक अग्निशमन कक्ष तयार करा, अशी सूचना त्यांनी केली. ही यंत्रणा फुलप्रुफ करा, जेणेकरुन याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करता येऊ शकते. तर सोसायटीने फायर ऑडिट करता संस्थेची नेमणूक केली. परंतु त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून योग्यप्रकारे देखभाल होत आहे का हेही पहायला हवे, असे सांगितले.
(हेही वाचाः वन अविघ्न पार्क अग्नितांडवः मॉक ड्रील होऊनही उडाला गोंधळ! चूक कोणाची?)
चौकशी सुरू
यावर बोलताना अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी विशिष्ट उंचीच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याची जबाबदारी ही रहिवाशी व मालकाचीच असल्याचे स्पष्ट केले. अती उंच इमारतींध्ये स्प्रिंकर्सच्या माध्यमातूनच आग विझवण्यावर भर दिला जातो. करी रोड येथील ज्या इमारतीला लाग लागली होती, त्याची अतिरिक्त आयुक्त(शहर) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे. आपण घेतलेल्या प्राथमिक माहितीमध्ये त्याठिकाणी आग प्रतिबंधक प्रणाली कार्यान्वित होती, परंतु सुरुवातीला त्याचा वापर योग्यप्रकारे न झाल्याने, योग्य दाबाने पाणी येत नव्हते. पण त्यानंतर अग्निशमन दलाने सिस्टम पाहून प्रेशर वाढवल्यानंतर पाण्याचे प्रेशर वाढले, अशी माहिती मिळाली होती. एकमेव अपवाद वगळता ६०० ते ७०० लोकांना सुरक्षित बाहेर काढले होते. ज्या एकाचा मृत्यू झाला तोही वेगळ्या कारणाने झाला होता, हे आपण पाहिले, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community