कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षासुद्धा रद्द करुन 10वी -12वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यांकनानुसार गुण देण्यात आले होते. पण, आता राज्य सरकारने शाळा सुरु केल्याने केंद्रीय शिक्षण मंडळाने 10वी-12वीच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई आणि आयसीएसई या बोर्डांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार लेखी परीक्षा घेऊनच निकाल जाहीर केला जाणार आहे.
सुट्ट्यांनंतर लगेचच होणार घोषणा
शालेय शिक्षण मंडळाचे अधिकारी, मुख्याध्यापक, मॅाडरेटर, संस्थाचालक, शिक्षक आदी परीक्षांशी संबंधित मंडळींशी नुकतीच चर्चा झाली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नेहमीच्या वार्षिक लेखी परीक्षेनुसारच दहावी- बारावीचे निकाल जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब झाले. दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत घोषणा होणार असून परीक्षा निकालांबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा संभ्रम दूर केला जाणार आहे.
(हेही वाचा : क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना बहिणीच्या नात्याने आर्जव! म्हणाली…)
तरच अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल
गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेता न आल्याने शाळांनी केलेल्या अंतर्गत मूल्यांकनाद्वारे दहावी- बारावीचे निर्णय जाहीर करण्यात आले होते. आता झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत आल्याची हमी अनेक मुख्याध्यापकांनी या बैठकीत दिली. पण आता कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, जर लेखी परीक्षा घेता आल्या नाहीत तरच, अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community