राणी बाग सोमवारपासून खुली! कुणाला मिळणार प्रवेश?

प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल.

155

कोविड – १९ संसर्ग कालावधीत बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येत्या सोमवारपासून अर्थात १ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पुन्‍हा खुले करण्यात येत आहे.

सायंकाळी ४ वाजता तिकीट खिडकी बंद 

प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल. दिवसभरात/सुटीच्‍या दिवशी कोणत्‍याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्‍ये जास्‍त प्रमाणात गर्दी झाली असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कोविड सुरक्षेच्‍या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता ताबडतोब बंद करुन तिकीट विक्री थांबविण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुले (५ वर्षांखालील) यांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या सर्व निर्देशांचे पर्यटकांनी पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

(हेही वाचा : महापालिकेचा ‘ती’ घोषणा म्हणजे ‘भुलभुलैया – भाग दोन’)

‘ही’ घ्यावी लागणार काळजी

  • प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मुखपट्टी (मास्क) चा वापर अनिवार्य असेल.
  • कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव/संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी.
  • कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे, गर्दी करू नये. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
  • प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत-कमी साहित्य आणावे. साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
  • प्रवेशद्वाराजवळील हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) सुविधेचा उपयोग केल्यानंतरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
  • प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने/समुहाने फिरू नये. प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
  • कोविड विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
  • प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये व थुंकू नये. कचराकुंडीचा वापर करावा.
  • एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचर्याच्या डब्यात टाकावे.
  • कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राणिसंग्रहालयातील जवळपासच्या सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा.
  • कोणतेही खाद्यपदार्थ प्राणिसंग्रहालयात आणू नये.
  • प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर प्रसाधनगृहातील साबण द्रावणाचा (लिक्वीड सोप) उपयोग करावा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.