समीर वानखेडे यांनी जाणुनबुजुन मुलांना अडकवले आहे. ही केस फर्जीवाडा आहे. पुरावे घेऊन हे लोक न्यायालयात गेले, तर ही केस बाद ठरु शकते, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. लोकांना तुरुंगात टाकणारे समीर वानखेडे आज तेच न्यायालयात जाऊन मुंबई पोलिसांकडे केस न देता माझी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा, म्हणत आहेत, मात्र मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांना अटक करायची असेल तर ७२ तासांची नोटीस दिली जाईल, असे एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गुरुवार मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर होताच एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटर वरून पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!’, असे ट्विट करून एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांना गर्भित इशारा दिला आहे.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 28, 2021
तुरुंगात टाकणारा तुरुंगात जायला घाबरतोय!
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर २५ दिवसानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला. तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावला. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केली.
(हेही वाचा : २५ दिवसांनंतर आर्यन खानची झाली सुटका! पण…)
एनसीबी विरोधात न्यायालयात जाणार
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्यन खानसह तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी कालच दोन आरोपींना एनडीपीएस विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. ज्या प्रकारे फर्जी प्रकरण बनवण्यात आले, सुरुवातीलाच न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. मात्र प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसे ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल, यासाठी एनसीबीचे प्रयत्न असतात. ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवले त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असेही मलिक म्हणाले. कालपर्यंत मला अटक करु नका मला संरक्षण द्या असे सांगणारे समीर दाऊद वानखेडे उच्च न्यायालयात धाव घेतात आणि मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवतात याचा अर्थ यामध्ये काळंबेरं आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
Join Our WhatsApp Community