तुमच्या शहरात धरण आहे? मग तुम्ही बुडणार! कारण जाणून घ्या…

जगभरातील 55 टक्के धरणांमध्ये चीन, जपान, भारत आणि दक्षिण कोरिया हे चार आशियाई देश योगदान देतात. यापैकी बहुतांश धरणे 50 वर्षांच्या मर्यादेपर्यंत पोहोचले आहेत.

115

पाणी अडवण्यासाठी अथवा पाण्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मिती सारखी कार्ये साधली जातात. पण मानवाच्या उपयोगासाठी बांधलेली हीच धरणे जर त्याच्या मृत्यूचे कारण बनणार असतील तर..होय हे खर आहे. संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या विश्लेषणानुसार, 2050 पर्यंत बहुतांश लोकं 20व्या शतकात बांधल्या गेलेल्या हजारो मोठ्या धरणांच्या प्रवाहाखाली येण्याची शक्यता आहे.

काय म्हणतो अहवाल?

जगातील हजारो मोठ्या धरणांची बांधकामे धोकादायक बनली आहेत. ही धरणे सध्या त्यांच्या डिझाइन लाइफपेक्षा जास्त वर्षे कार्यरत आहेत. जगभरातील सुमारे 10 हजार धरणांचे आयुर्मान संपले आहे. त्यातील काही धरणे 50 वर्षे जुनी, तर काही धरणांनी 100 वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे, असे या अहवालात म्हटले आहे. भारतातील सुमारे 4 हजार 250 मोठी धरणे 2025 पर्यंत 50 वर्षांहून अधिक जुनी होणार आहेत. तर 2050 पर्यंत 64 मोठी धरणे 150 वर्षांपेक्षा जुनी होणार आहेत, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

(हेही वाचा : फेसबुक नाही…आता तुम्ही होणार ‘मेटा’चे यूजर्स)

…तर 3.5 दशलक्ष लोकसंख्या येणार पाण्याखाली

जगभरातील 55 टक्के धरणांमध्ये चीन, जपान, भारत आणि दक्षिण कोरिया हे चार आशियाई देश योगदान देतात. यापैकी बहुतांश धरणे 50 वर्षांच्या मर्यादेपर्यंत पोहोचले आहेत. या अहवालानुसार ही धरणे भूकंप प्रवण भागात आहेत. त्यामुळे तिथे भूकंप होण्याची शक्यता आहे. धरणांचे उद्दीष्ट आयुर्मान 50 वर्षे असते. भूकंपांंमुळे धरणे निकामी होण्याचा धोका अधिक आहे. केरळमधील मुल्लापेरियार धरण, 1895 ला पेरियार नदीवर बांधण्यात आले होते. या धरणाचे आयुर्मान संपले असून, या धरणाचा धोकादायक धरणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. धरणाच्या पायाभूत सुविधा बिघडत असल्याचं दिसत असताना, केरळ आणि तामिळनाडूमध्ये त्याच्या देखभालीवरून वाद होत आहेत. 1979 मध्ये आलेल्या भूकंपामुळे या धरणाला तडे गेले. त्यामुळे यावर वेळीच योग्य तो तोडगा काढला नाही तर , 3.5 दशलक्ष लोकसंख्या पाण्याखाली येण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.