राज ठाकरे कुटुंबांसह झाले कोरोनामुक्त!

उपचारानंतर या तिघांची शुक्रवारी दुपारी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या चाचणीचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत.

127

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त आल्यावर खळबळ उडाली होती. त्यानंतर राज यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी, २९ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांना कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले. त्यांच्या सोबत राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई, बहीण जयजयवंती हेदेखील कोरोनातुन मुक्त झाले आहेत.

सर्वांनी लसींचे दोन डोस घेतलेले

उपचारानंतर या तिघांची शुक्रवारी दुपारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या चाचणीचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिली. गेल्या शुक्रवारी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांना आणि गेल्या शनिवारी स्वतः राज ठाकरे आणि बहीण जयजयवंती देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले होते. कोरोनाची लागण झाल्याने राज ठाकरे यांनी गेल्या शनिवार आणि रविवारी मुंबई आणि पुण्यात आयोजित केलेले पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे पुढे ढकलले होते.

(हेही वाचा : अखेर राज ठाकरे यांना कोरोनाने गाठले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.