परमबीर सिंगांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट!

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

107

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गोरेगाव येथे २ खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी त्यांना न्यायालयाने हजर राहण्याचा न्यायालयाने आदेश देऊन सिंग बेपत्ता आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढला. याआधीही ठाणे न्यायालयाने सिंग यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात ऍट्रॉसिटी दाखल 

परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटींविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे न्यायालयानंतर आता मुंबई न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावण्यात आले. मात्र सिंग हे बेपत्ता आहेत. त्यांचा ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नाही. दरम्यान राज्य सरकारनेही नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाला ‘आम्ही परमबीर सिंग यांना अटक करण्याची कारवाई करू शकतो’, असे सांगितले.

(हेही वाचा : नक्षलवाद्यांची धमकी तरीही एकनाथ शिंदे गडचिरोलीत! नेमके काय घडले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.