उरण-पनवेल मार्गावर पुलाचा गर्डर कोसळला! ५ जखमी

या जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

127

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र उत्साही वातावरण असताना पनवेलमध्ये मात्र मोठी दुर्घटना घडली आहे. उरण -पनवेल मार्गावर पुलाच्या बांधकामातील एक लोखंडी सांगाडा कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. त्या जखमींपैकी एकाही परिस्थिती गंभीर असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जासईन गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते!

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर ही घटना घडली आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घडली. जासईन गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान हा गर्डर कोसळला. पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगडा थेट खाली कोसळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे भलामोठा आवाज झाला. त्यामुळे नेमके काय घडले हे पाहण्यासाठी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पुलाचे काम करणारे ५ कामगार जखमी झालेले आढळून आले. या जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना तातडीने  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरण मार्गावर या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. क्रेनच्या मदतीने कोसळलेला लोखंडी सांगाडा बाजूला हटवण्याचे काम सुरू झाले.

(हेही वाचा : आता छटपूजेसाठीही कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.