भारतीय वायुसेनेने बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांना बढती दिली आहे. अभिनंदन वर्धमान हे आतापर्यंत विंग कमांडर पदावर होते आणि भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान ग्रुप कॅप्टनचा दर्जा दिला आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय हवाई दलाकडून पदोन्नती
विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले. यामुळे पाकिस्तानी सैन्याने विंग कमांडर अभिनंदन यांनी कैद केले होते असे असताना देखील अभिनंदन पाकच्या कैदीतून अभिमानाने भारतात परतले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्याबद्दल अभिनंदन वर्धमान यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
(हेही वाचा- अखेर पेट्रोल-डिझेलचे दर घसरले! किती झाले?)
ग्रृप कॅप्टनचा दर्जा हा कर्नलच्या बरोबरीचा
भारतीय हवाई दलाने त्यांना पदोन्नती दिल्याने लवकरच ते अधिकृतपणे हे पद सांभाळणार आहेत. अभिनंदन वर्धमान यांना देण्यात आलेल्या ग्रृप कॅप्टनचा दर्जा हा भारतीय सैन्यात कर्नलच्या बरोबरीचा असतो. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलेल्या अभिनंदन यांना सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर पाक लष्कराला त्यांची सुटका करणे भाग पडले.
Join Our WhatsApp Community