राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत. पुढच्या आठवड्यात ते आणखी तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. एवढेच नाही तर किरीट सोमय्या हे १० नोव्हेंबर रोजी एका मंत्र्याविरोधात तक्रार देखील दाखल करणार आहेत त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या रडारवर महाविकास आघाडीचे ते तीन नेते कोण, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. ८ आणि ९ नोव्हेंबरला दिल्लीत आयकर विभाग, सीबीडीटी, ईडी आणि सहकार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही ते भेट घेणार आहेत.
मी 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग CBDT, ED, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे
10 नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारचे मंत्री यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार
पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे काढणार त्या पैकी हा पहिला खुलासा, अँक्शन
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 6, 2021
काय म्हणाले किरीट सोमय्या?
सध्या किरीट सोमय्या हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकरणे उघडकीस आणत असतानाच त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणतात, मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग CBDT, ED, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. १० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारचे मंत्री यांच्या विरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार. पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार, त्या पैकी हा पहिला खुलासा, अँक्शन, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community