गेल्या वर्षी कट्टर इस्लामी पक्षाच्या नेतृत्वाखालील जमावाने खैबर पख्तुनख्वा प्रांतातील शतकानुशतके जुन्या मंदिरावर हल्ला केला होता आणि ते जाळलेही होते. ज्याठिकाणी पाकिस्तान हिंदू परिषदेकडून सोमवारी दिवाळीचा भव्य उत्सवाचे आयोजन करणार आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद हे सुप्रसिद्ध टेरी मंदिरात होणाऱ्या उत्सवात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतात होणार जल्लोष
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमध्ये रविवारी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, पीएचसीचे संरक्षक आणि नॅशनल असेंब्लीचे सदस्य डॉ. रमेश कुमार वांकवानी यांनी सांगितले की, उत्सवादरम्यान वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीने हल्लाखोरांना चांगलाच संदेश पोहोचले. जेणे करून त्यांना कळून चुकेल की, त्यांचे हे नापाक मनसुबे कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडले जातील. टेरीच्या वार्षिक जत्रेत सहभागी होण्यासाठी सिंध आणि बलुचिस्तानमधून येणाऱ्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, परिषदेने इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) ला हसनाबदल येथे साधारण दीड हजार यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
(हेही वाचा – भारतीय रेल्वेकडून मिळणार “रामायण यात्रेचा” आनंद)
मौलवींच्या नेतृत्वाखाली जमावाने उद्ध्वस्त केले मंदिर
असे सांगितले जात आहे की, या उत्सवासाठी भाविक हसनाबदलला दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, तेथून ते सोमवारी करकच्या टेरी प्रातांत रवाना होतील आणि त्याच दिवशी परततील. हे मंदिर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यातील संत श्री परमहंस जी महाराज यांच्याशी संबंधित आहे. तेथे १९२० मध्ये मंदिराची स्थापना झाली. मात्र, गेल्या वर्षी जमियत उलेमा इस्लाम-फझलशी संबंधित स्थानिक मौलवीच्या नेतृत्वाखाली जमावाने त्याची तोडफोड केली होती. पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांच्या आदेशानुसार मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये जुन्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांकडून ३.३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने खैबर पख्तुनख्वा प्रांत सरकारला दिले आहेत.
Join Our WhatsApp Community