एनसीबीचं विशेष पथक करणार ‘या’ ६ गुन्ह्याचा तपास

127

एनसीबी उपमहासंचालक आणि विजिलन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह ६ अधिकारी चौकशी करत आहेत. या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेले किरण गोसावी आणि गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलची चौकशी सुरू आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह आणि विशेष पथकाने क्रूझ ड्रग्स प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस, लोअर परळ फिनिक्स मॉल आणि ताडदेव मधील इंडियाना बार या ठिकाणाला सोमवारी भेटी देऊन या जागेची पाहणी केली आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची देखील पहाणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या चौकशीदरम्यान, एकूण ६ गुन्ह्याचा तपास एनसीबीच्या विशेष पथकाकडून केला जाणार आहे.

दरम्यान, प्रभाकर साईल याचा जबाब उद्या, मंगळवारी नोंदवण्यात येणार असून साईलला उद्या एनसीबी कार्यालायत बोलवण्यात आले असल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली. तसेच या क्रुझ प्रकरणाशी संबंधिताना समन्स बजावून त्यांचे देखील पुन्हा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे उपमहासंचालक सिंह यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – आता हेल्पलाईन रोखणार आत्महत्या!)

६ गुन्ह्याचा तपास एनसीबीकडून सुरू

किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यात लोअर परळ येथील फिनिक्स मॉल जवळ मर्सडीझ या आलिशान मोटारीत १८ कोटींची डील झाली होती, असा आरोप साईल या साक्षीदाराने केला आहे. यासाठी तसेच इंडियाना बार येथे ५० लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली होती, असे साईल याने म्हटले होते त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एनसीबी एसआयटीकडून क्रुझ ड्रग्स, समीर खान ड्रग्स प्रकरण, डोंगरी चिंटू पठाण, अरमान कोहली आणि जोगेश्वरी येथील दोन असे एकूण ६ गुन्ह्याचा तपास एनसीबीच्या विशेष पथकाकडून करण्यात येत आहे. विशेष पथकातील अधिकारी हे दिल्ली येथून आले असून हा तपास निःपक्षपणे करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.